अहमदाबाद :
गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी आसाराम बापूंचा अंतरिम जामीन कालावधी पुन्हा एकदा 3 सप्टेंबरपर्यंत वाढविला आहे. आसाराम यांना 2013 साली बलात्काराच्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते आणि आजीवन कारावासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली होती. आसाराम हे मागील काही काळापासून आरोग्य समस्यांमुळे तुरुंगाबाहेर उपचार घेत आहेत. तर राजस्थान उच्च न्यायालय बुधवारी अन्य एका प्रकरणी अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी करणार आहे.









