ओटवणे/ प्रतिनिधी-
असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक साक्षी सुभाष गावकर ८९.८० % (५०० पैकी ४४९ गुण) द्वितीय क्रमांक अस्मिता आनंद सावंत ८७ % (५०० पैकी ४३५ गुण) स्वप्नाली संजय सावंत ८४ % (५०० पैकी ४२० गुण) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर विशेष श्रेणीत ३४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ८ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष मिलिंद तोरसकर, सचिव कल्पना तोरसकर, माजी सरपंच एम डी सावंत, मुख्याध्यापक कैलाश जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.









