ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले. सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागायला सांगितली आहे. “पंतप्रधान नुपुर शर्माविरोधात कारवाई करणार आहेत की नाही? केवळ निलंबन ही शिक्षा नाही हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. तुम्ही फक्त नुपूर शर्माचे पंतप्रधान नाही,” असे औवेसी यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना, “जवळपास २० कोटी मुस्लिम असलेल्या १३३ कोटींच्या भारताचे तुम्ही पंतप्रधान आहात. अजून नुपुर शर्माला किती दिवस वाचवणार आहात?” असेही ते म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर जोरदार टीका करून “देशात जे काही घडत आहे त्यासाठी त्या एकट्या जबाबदार आहेत” असे म्हटले होते. शर्माच्या “मोकळ्या जिभेने संपूर्ण देश पेटला आहे”, सर्वोच्च न्यायालयाने तिच्याविरुद्ध दाखल केलेल्या सर्व एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी करणारी तिची याचिका फेटाळून लावली आहे.