येत्या 19 जून रोजी होणार मतदान
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य दुग्ध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या संचालक मंडळासाठी येत्या 19 जून रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत 38 उमेदवार रिंगणात आहेत. राज्य सहकार निबंधकांनी या 38 उमेदवारांची यादी जाहीर करुन त्यांना निवडणूक चिन्हेही दिली आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या निवडणुकीला होणारा विरोध व त्या पार्श्वभूमिवर संचालक मंडळ बिनविरोध निवडून आणण्याच्या उच्च स्तरीय प्रयत्नांनाही कलाटणी मिळाली आहे. एकूण 12 जागांसाठी ही निवडणूक होत असून राज्यभरातील साधारण 170 स्थानिक दूध संस्थांचे अध्यक्ष मतदान करणार आहेत.
रिंगणात असलेल्या 38 उमेदवारांपैकी बहुतेक माजी अध्यक्ष व संचालक आहेत. निवडणुकीचे पॅनल अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी माजी अध्यक्ष श्रीकांत नाईक, माधव सहकारी व विठोबा देसाई या तीन पॅनलमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.
38 उमेदवारांमध्ये नवसो महादेव आरोलकर, चंद्रकांत सिद्धू भाटीकर, अजय लक्ष्मीकांत देसाई, अनुप कालिदास देसाई, भागिरथी दत्ता देसाई, धनंजय नांदबा देसाई, संदीप गणपत देसाई, बाबुराव श्रीकांत फट्टो देसाई, विठोबा दत्ता देसाई, सुधीर उत्तम धाऊस्कर, दयानंद फळदेसाई, राजेश कृष्णा फळदेसाई, रवींद्र उत्तम फळदेसाई, बाबू देऊ फळू, मंगेश कायतानो फर्नांडिस, आसेल्मो फुर्तादो, विजयकांत विठोबा गावकर, प्रकाश भिकू जल्मी, नीलेश प्रभाकर मळीक, गोविंद लाडू नाईक, श्रीकांत पांडुरंग नाईक, अदिनाथ अनंत परब, गुरुदास केशव परब, गुरुदास शांताराम परब, मदन कृष्णा परब, वैभव मोहन परब, संदेश कांता पाटील, शिवानंद बाबलो पेडणेकर, उदय आनंद प्रभू, विकास विश्वनाथ प्रभू, नितिन विश्वनाथ प्रभूगावकर, माधव आत्माराम सहकारी, दिपाजी हिरबाराव राणे सरदेसाई, ज्ञानेश्वर कुष्टा सावंत, दुर्गेश मधुकर शिरोडकर, प्रमोद वासुदेव सिद्धये, उल्हास पांडुरंग सिनारी, विश्वास सिताराम सुखटणकर यांचा समावेश आहे.
घोटाळेग्रस्त डेअरीची निवडणूकही वादग्रस्त
निवडणूक लढविणाऱया काही माजी संचालकांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून त्यासंबंधी खटले उच्च न्यायालयात सुरु आहेत. गोवा डेअरीतील भ्रष्टाचार व गैरवव्यवहाराच्या मुद्यावर निवडणूक रद्द करण्याची मागणी काही दूध उत्पादकांनी लावून धरली आहे. या पाश्वभूमीवर गोवा डेअरीची ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय बनून राहिली आहे.
उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संचालक मंडळ बिनविरोध निवडून आणण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत राजकीय पातळीवर जोरदार घडामोडी सुरु होत्या. 38 जणांपैकी 26 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तयारीही दाखविली होती. मात्र ऐनवेळी तिघा उमेदवारांनी दगा दिल्याने हे प्रयत्न असफल ठरले व मंगळवारी सहकार निबंधकांनी 38 उमेदवारांची अंतिम यादी मतदान चिन्हासह जाहीर केली.









