सीबीआयची धडक मोहीम
पणजी : सीबीआयने आयकर खात्याच्या एका निवृत्त अतिरिक्त आयुक्ताच्या एकूण 14 मालमत्ता जप्त केल्या. त्यातील काही मालमत्ता या गोव्यातील आहेत. प्राप्त माहितीनुसार सीबीआयने सर्व ठिकाणी धडक मोहीम सुरू केली आहे. सदर अधिकारी हा 2008 ते 2018 यादरम्यान गोव्यात होता. या भारतीय महसूल सेवा अंतर्गत असलेल्या अधिकाऱ्याने बरीच मालमत्ता निर्माण केली होती. एकूण सात कोटीची मालमत्ता सीबीआयने छापे टाकून जप्त केली आहे. एकूण 14 मालमत्ता जप्त केलेल्या असून त्यातील काही मालमत्ता या गोव्यातील आहेत. जप्त केलेल्या मालमत्तांची रक्कम 7. 52 कोटी ऊपये एवढी आहे. गाजियाबाद लखनऊ हरडोई आणि बाराबंकी येथीलही त्याच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.









