पशू वैद्यकीय विभागाचे पथक चिंदर येथे दाखल
शवविच्छेदन अहवालानंतर होणारं कारण स्पष्ट
आचरा प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील चिंदर गावात दोन दिवसात तब्बल ११ गुरे दगावल्याची घटना घडली आहे. अज्ञात आजारामुळे ही गुरे दगावली असून निश्चित आजाराचे निदान झालेले नाही. गुरे दगावत असल्याचे समजल्यानंतर रविवारी सकाळी जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वप्नील अंबी यांच्या समवेत पशू वैद्यकीय पथक चिंदर येथे दाखल झाले होते. या पथकाने मृत्यू झालेल्या जनावरांचे शविच्छेदन केले. तपासणी साठी काही नमुने घेतले असून ते पुणे येथील प्रयोशाळेत पाठवले जणार आहेत त्यांनतर आजाराचे निश्चित कारण सामोरं येणार आहे. नव्याने उगवलेल्या रानावरील बुरशीजण्य विषारी पदार्थ पोटात गेल्याने गेल्याने ही गुरे दगावली जात असल्याचा प्राथमिक अंदाज या पथकाने दर्शवला असून निश्चित कारण मात्र प्रयोगशाळेतील आहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. ऐन शेतीच्या हंगामात असे संकट ओढवल्याने तेथील शेतकरी चिंतातूर झाला असून त्यांच्यावर आर्थिक संकटही ओढवले आहे.
दिवसा चरायला गेलेली गुरे रात्री दगावली
चिंदर गावात बहुतांश शेतकरी हे आपली गुरे उघड्या माळरानावर चरण्यासाठी सोडतात गेल्या दोन दिवसांपासून सकाळी चरावयास गेलेली गुरे सायंकाळी घरी परतल्यानंतर गोठ्यात बांधल्यानंतर रात्रीच्या सुमारास या धडधाकट आसलेल्या गुरांच्या घशा कडील भागाला सूज येऊन गुरांचे पोट मोठ्या प्रमाणात फुगले अंगात ताप अशी अवस्था होऊन गुरे रवंथ करण्याचेही बंद करण्याची थांबली चारा खाण्याचे सोडुन देत काही वेळातच ती गुरे दगावत होती अशी महिती स्थानीक शेतकऱ्यानी आलेल्या पशूवैद्यकीय पथकास दिली आहे. अशाच पद्धतीने चिंदर येथील शेतकरी गणेश पाटणकर, संतोष पाटणकर, गणेश तावडे, वसंत पाडावे, मिलिंद चिंदरकर, श्रीकांत कांविनदे, बाळा कांविनदे आनंद चिंदरकर,निलेश रेवडेकर दिलीप परब यांची दोन दिवसांत ११ गुरे दगावली आहेत.
पथकाकडून गावातील अन्य गुरांची तपासणी सुरू
चिंदर गावात दाखल झालेल्या पथकाने आवश्यक असणाऱ्या तपासण्या केल्यानंतर प्रभारी सरपंच दीपक सुर्वे ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धेश नाटेकर , रणजित दत्तदास यांना बरोबर घेत डॉ. स्वप्नील अंबी व त्यांच्या पथकाने गावातील ठिक ठिकाणी गोठ्यातील गुरांच्या तपासण्या करण्याचे काम हाती घेतले गुरांचे टेंप्रेचर, दिसून येणारी लक्षणे आदी तपासण्या सुरू केल्या आहेत. याला स्थानिक शेतकरी यांनीहि त्यांना सहकार्य केले.









