कोल्हापूर :
कोल्हापूरातून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये दर वर्षी वाढ होत आहे. या वर्षभरात तब्बल 1 लाख 48 हजार 266 प्रवाशांनी विमानाने प्रवास केला आहे. सध्या खासगी विमान कंपनी मार्फत कोल्हापुरातुन मुंबई, अहमदाबाद, तिरूपती, हैदराबाद आणि बेंगलूरू या ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. ही सर्व विमाने प्रवाशांनी नेहमी फुल्ल असतात.
एअर सर्व्हिसेस ऑफ इंडियाने 1939 मध्ये कोल्हापूरच्या संस्थानांसाठी विमान सेवा सुरू केली. या हवाई सेवेची सुरुवात कोल्हापुरात होण्यासाठी राजाराम महाराज यांनी या प्रकल्पात लक्षणीय स्वारस्य दाखवले. या संदर्भात त्यांनी त्यांच्या मालमत्तेतील अत्यावश्यक एरोड्रोम सेवांसाठी असेंबल करण्याव्यतिरिक्त कंपनीला आर्थिक सहाय्य केले. कोल्हापूर विमानतळाचे 16 एप्रिल 1997 रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जबाबदारी गेली. 2012 मध्ये भाडेपट्टीची मुदत संपल्याने राज्य सरकारने मे 2012 मध्ये विमानतळ चालवण्याच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करत भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पुन्हा ताब्यात दिले. यानंतर कोल्हापूर विमानतळाचा झपाट्याने विकास झाला.
गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापुरातून विमानातून प्रवास करण्याऱ्यांची र्सख्या वाढत आहे. नुकतेच कोल्हापूर विमनतळाच्या इमारतीचे नुतनीकरण केले आहे. प्रवाशांना हायटेक सुविधा दिल्या आहेत. यामुळे प्रवाशांची संख्येत भरच पडत आहे. वर्षभरात तब्बल 1 लाख 48 हजार 266 प्रवाशांनी कोल्हापूरातून विमानसेवेने प्रवास केला आहे. यामध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत तब्बल 28 हजार जणांनी विमान प्रवास केला आहे. स्टार आणि इंडिगो या खासगी विमानसेवा कंपनीकडून सध्या कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद, तिरूपती, हैदराबाद आणि बेंगलूरू या विमानसेवा सुरू आहेत.
इतर वाहतुक सेवांच्या तुलनेत विमानाने आरमदायी आणि जलद प्रवास होतो. यामुळेच कोल्हापुरातील व्यवसायिक, नोकरदार, पर्यटकांचा विमानाने प्रवास करण्यास प्राधान दिले जात आहे. यामुळेच कोल्हापुरातील बाहेर जाणाऱ्यांची आणि विमानाने परजिल्हा, पर राज्यासह देशाबाहेरून कोल्हापुरात येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. कोल्हापुरातून दिल्ली, गोवा, शिर्डी, नागपूरला विमान सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. या सेवा सुरू झाल्यास प्रवाशांच्या संख्येत आणखीन वाढ होणार असून कनेक्टीव्हीटी वाढण्यातही मदत होणार आहे.
कोल्हापूर विमानतळ येथील वर्षभरातील स्थिती
महिना विमान संख्या प्रवाशांची संख्या
जानेवारी 275 13404
फेब्रुवारी 287 12773
मार्च 287 13495
एप्रिल 332 14065
मे 355 14820
जुन 253 13224
जुलै 216 11322
ऑगस्ट 248 12113
सप्टेंबर 280 12313
ऑक्टोंबर 297 12595
नोव्हेंबर 388 14106
डिसेंबर 74 4034
एकूण 1 लाख 48 हजार 264
विमानसेवा वार कंपनी
कोल्हापूर–अहमदाबाद सोमवार, गुरूवार, शुक्रवार, शनिवार स्टार एअरलाईन
कोल्हापूर–मुंबई प्रतिदिन स्टार एअरलाईन
कोल्हापूर–तिरूपती मंगळवार, बुधवार, रविवार स्टार एअरलाईन
कोल्हापूर–हैदराबाद प्रतिदिन इंडिगो
कोल्हापूर–बेंगलूरू प्रतिदिन इंडिगो
कोल्हापूरमध्ये विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्येत वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत या 17 टक्के प्रवासी संख्या वाढली आहे. जानेवारी 2024 ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान 1 लाख 48 हजार प्रवाशांनी विमानाने प्रवास केला आहे. विमानतळाच्या नुतन इमारतीमध्ये प्रवाशांना दर्जदार सुविधा देण्यात आल्या आहेत.
अनिल शिंदे, संचालक कोल्हापूर विमानतळ








