वृत्तसंस्था/ स्टुटगार्ट
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या स्टुटगार्ट खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेलारुसची द्वितीय मानांकित महिला टेनिसपटू आर्यना साबालेंका एकेरीची उपांत्य फेरी गाठताना स्पेनच्या पावोला बेडोसाचा पराभव केला.
शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामान्यात साबालेंकाने बेडोसाचा 4-6, 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत तिने उपांत्य फेरी गाठली आहे. हा सामना अडीच तास चालला होता. आता साबालेंका आणि रशियाची पोटापोव्हा यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. पोटापोव्हाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या चौथ्या मानांकित कॅरोलिनी गार्सियाचे आव्हान 4-6, 6-3, 6-3 असे संपुष्टात आणले. 2023 च्या टेनिस हंगामामध्ये ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम विजेत्या साबालेंकाने आतापर्यंत सहा स्पर्धांपैकी चार स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. तिला दोनवेळा यापूर्वी या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.









