बेळगाव :
सार्वजनिक शिक्षण विभाग आयोजित विभागीय कराटे स्पर्धेमध्ये डिव्हाईन प्रॉव्हिडन्स स्कूलची विद्यार्थिनी आर्या संतोष शहापूरकरने उत्कृष्ट कामगिरी करत 60 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. तिची आगामी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी जिल्हा संघात स्थान निवड झाली आहे. उत्कृष्ट कौशल्य, आत्मविश्वास आणि चिकाटी दाखवत आर्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करून सुवर्णपदक जिंकले. ती 9 आणि 10 नोव्हेंबर 2026 रोजी चिक्कबळ्ळापूर येथे होणाऱ्या सार्वजनिक शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत जिह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. आर्याला नितीन खानापुरकर (अस्तेकर) यांचे मार्गदर्शन तर गजेंद्र काकतीकर, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक यांचे मोठे प्रोत्साहन आणि सहकार्य लाभले आहे.









