Arvind Sawant on Sharad Pawar : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी मोठा दावा केला आहे. रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असे शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलले होते असे अरविंद सावंत यांनी म्हटलय. 2019 साली मविआसाठी जुळवाजुऴव सुरु होती त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच नाव सुचवलं होत.यावेळी पवारांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असा सवाल केल्यानंतर ठाकरेंनी स्वत: शिवधनुष्य पेलायचं ठरवलं अस सावंत म्हणाले. या वक्तव्या संदर्भात एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सावंत यांनी यावर स्पष्टीकरण देत रिक्षावाला हा शब्द शरद पवार यांनी नाही तर आम्ही उच्चारला होता अस म्हणत यू-टर्न घेतला. तर उध्दव ठाकरे यांना का मुख्यमंत्री पद स्विकारल याचं उत्तरही दिलय.
काय म्हणाले अरविंद सावंत
रिक्षावाला हा शब्द आम्ही वापरतो. शरद पवार म्हणाले होते की, आपल्याकडे वरिष्ठ आणि अनुभवी लोक आहेत त्यांनी कोणाच्या हाताखाली काम करावं.काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत.त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा विचार तुम्हीच करा. मुख्यमंत्रीपद तुम्ही घ्या असा वडिलकीचा अधिकार त्यांनी गाजवला.त्यामुळेच उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्विकारलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केल. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांची रणनिती यशस्वी झाली-संजय शिरसाट
एकनाथ शिंदे कार्यकर्ता असल्य़ाने ग्राउंड लेवलवर फिरणार याची पोटदुखी शरद पवार यांना होती. कोणताही सामान्य कार्यकर्ता हा पदावर जाऊ शकतो. एकनाथ शिंदेंची क्षमता पाहता शरद पवार यांना अडचणीच ठरणार होत. त्यांना माहित होत की उध्दव ठाकरे हे सर्वसामान्यांच्यात फिरू शकणार नाहीत म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांना गळ घातलीआणि माळ गळ्यात घातली. अशाप्रकारे शरद पवारांची रणनिती यशस्वी झाली.
Previous Articleपुण्यात किराणा दुकानावर पोलिसांचा छापा; 65 लाखांचा गुटखा जप्त
Next Article उन्हाळा स्पेशल दही तडका पोहे








