Arvind Kejriwal News : सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केंद्राचा अध्यादेश चुकीचा असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. लवकरच केजरीवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 24 तारखेला ठाकरेंची तर 25 तारखेला पवारांची भेट घेणार आहेत. तर 23 तारखेला कोलकत्यात जाऊन केजरीवाल ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत.
राजधानी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांच्या मुद्द्यावरून केंद्र विरुद्ध आप सरकार असा उभा संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. केंद्र सरकारने या यानुषंगाने आणलेल्या अध्यादेशाला आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ असं केजरीवील यांनी म्हटलं आहे. संबंधित अध्यादेश हा राज्यघटना, लोकशाहीच्या विरोधात आहे. केंद्र सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयाचाच निकाल फिरवला असूनही हे न्यायालयालाच आव्हान दिल्यासारखे असल्याचे त्यांनी नमूद केलेयं. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असून विरोधी पक्षांनी याबाबतचे विधेयक राज्यसभेच्या आडवळणाने मंजूर होऊ देता कामा नये. यासाठी आपण विरोधीपक्षांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितलयं.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी आज दिल्लीत केजरीवाल यांची भेट घेतली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी ते भारतभर दौरा करत आहेत. यावेळी केजरीवाल यांना आपण पाठिंबा देणार असल्याचे नितीश कुमार म्हणाले.सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला काम करण्याचा अधिकार दिला आहे, तुम्ही तो कसा काढून घेऊ शकता? असा सवालही त्यांनी केला आहे.
यावेळी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, केंद्राच्या या निर्णयाला लोकशाहीला धोका आहे. हा संविधान बदलण्याचा प्रयत्न आहे.आम्ही तसे होऊ देणार नाही असं तेजस्वी यादव म्हणाले.
Previous Articleतळेरे येथे उद्या ‘हर्ष गान’ संगीत मैफिल
Next Article गझलकार मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार ११ जुलैला








