नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर शरद पवारांनी एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून पक्की झाली असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
-शरद पवार