अरुणा वाघ यांचा आरोप
प्रतिनिधी / पणजी
गोव्यतील नामांकीत साहित्यीक नाटककार स्व. विष्णू सुर्या वाघ यांच्या हस्तलिखीत साहित्याची चोरी करून सुदेश आर्लेकर यांनी बेकायदेशीर रित्या आयोजित केलेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनात प्रदर्शन मांडले. याबाबत जाब विचारण्यासाठी गेले असता आपला अपमान केल्याचे अरुणा वाघ यांनी सांगितले. सुदेश आर्लेकर यांच्यावर टीका करताना त्यांनी विष्णू सूर्या वाघ यांचे बंधू रामराव वाघ यांच्यावरही टीका केली आहे.
येथील गोमंतक साहित्य सेवा मंडळात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरुणा वाघ बोलत होत्या यावेळी त्यांच्या सोबत प्रियदर्शन वाघ उपस्थित होता. सुदेश आर्लेकर यांनी आपल्याबाबत निच पातळीवरील प्रश्न उपस्थित करून आपली लायकी काय आहे ते दाखवून दिले आहे. विष्णू सुर्या वाघ यांच्या हस्त लिखीत साहित्यावर त्यांच्या कुटुंबियांचा अधिकार असताना त्यांनी हे हस्तलिखीत चोरले आहे असे सांगतांना त्या म्हणाल्या की सुदेश आर्लेकर ही व्यक्ती साहित्य चोर संस्था चोर आहे. सुदेश आर्लेकर याला सरकारने कोणतेही अनुदान देऊ नये तसेच त्याला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी अरुणा वाघ यंनी केली आहे.
संमेलनाच्यावेळी जो प्रकार घडत होत तो प्रकार मोठमोठे साहित्यिक व प्राध्यप बघत होते मात्र सुदेश आर्लेकर यांनी विष्णू सुर्या वाघ यांचे हस्तलिखीत कसे आणले त्याबाबत कोणीच त्याला विचारत नव्हते ही एक दुर्दैवी बाब आहे. यावेळी त्यांनी रामराव वाघ यांच्यावरही टीका केली. नाटकाबाबत काडीचीही माहिती नसताना राजकारण करून आणि विष्णू सूर्या वाघ यांच्या नावाचा वापर करून कला अकादमीत मोठे पद मिळविले. विष्णू सुर्या वाघ हयात असताना त्यांनी घराचे दोन भाग करून एका बाजूने आम्ही बांधकाम करणार असले ठरलेले असतानाही आता त्यांनी ते घरही बळकाविले आहे. सांतआंद्रे मतदार संघाची उमेदवारी मिळविली होती ती सुध्द विष्णू सूर्या वाघ यांच्या नावानेच. असे अनेक किस्से सांगत अरुणा वाघ यांनी रामराव वाघ यांच्यावर खरपूस टीका केली.
विष्णू सुर्या वाघ यांचे अप्रकाशीत साहित्य मोठय़ा प्रमाणात आहेत. त्याचा कुणालाही त्यांनी अधिकार दिलेला नाही. त्यांची बायको या नात्याने ते साहित्य दर्जेदार पध्दतीचे पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करण्याची आपली जबाबदारी असून ती आपण पार पाडीत आहे. आत्तापर्यंत सहा पुस्तके प्रकाशीत केली असून अजून पन्नासहून अधिक पुस्तक प्रकाशीत करायची आहे ती ठरल्यावेळेत प्रकाशीत करीत असेही अरुणा वाघ यांनी सांगितले.









