सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडीतील येथील रहिवासी अरुण वामन स्वार (72)यांचे मुंबई गोरेगाव येथे त्यांच्या निवासस्थानी रविवारी निधन झाले. पश्चात पत्नी ,मुलगा, मुलगी ,भाऊ असा परिवार आहे. जिल्हा प्रौढ साक्षरता विभागातून ते सेवानिवृत्त झाले होते. कळसुलकर हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी असून येथील रवींद्र स्वार यांचे ते बंधू होत.









