ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारतीय वंशाचे अमेरिकन अरुण सुब्रमण्यम (Arun Subramanian) यांना न्यूयॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे या खंडपीठावर काम करणारे ते पहिले दक्षिण आशियाई न्यायाधीश बनले आहेत.
अमेरिकेने मंगळवारी संध्याकाळी सिनेटमध्ये यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला होता. अरुण सुब्रमण्यम यांच्या व्यतिरिक्त इतर नावांची देखील न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस करण्यात आली होती. 58-37 मतांनी अॅटर्नीकडून सुब्रमण्यम यांच्या नामांकनावर मोहोर उमटवण्यात आली. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अरुण सुब्रमण्यम यांच्या नावाची घोषणा केली. सुब्रमण्यम सध्या न्यूयॉर्कमधील लॉ फर्म सुसमन गॉडप्रे एलएलपीमध्ये भागीदार आहेत.
अधिक वाचा : वसंत मोरेंच्या मुलाला धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात









