नवी दिल्ली / वृत्तसंस्था
निवृत्त आयएएस अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशात अरुण गोयल यांना तात्काळ प्रभावाने पदाचा कार्यभार स्वीकारावा लागेल, असे म्हटले आहे.
1985 बॅचचे पंजाब केडरचे अधिकारी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी भारताच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. गोयल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांच्यासह मतदान पॅनेलमध्ये सामील होतील. सुशील चंद्रा या वर्षी मे महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर राजीव कुमार यांनी पदभार स्वीकारला होता.









