Arun Bali Passes Away : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या दुर्मिळ आजाराशी ते झुंज देत होते. काही महिन्यांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हिरानंदानी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. अरुण बाली यांनी चित्रपट तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.
अरुण बाली हे मनोरंजन विश्वातील खूप मोठे आणि प्रसिद्ध नाव होते. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ९० च्या दशकात केली होती. ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’, ‘केदारनाथ’ आणि ‘पानिपत’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका साकारत प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली होती.
Previous Articleमाजी आमदार चंद्रदीप नरके शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात!
Next Article गुलाल, भंडाऱयाच्या उधळणीत कडोली दसरोत्सव









