ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Artificial sun made by America after China चीननंतर आता अमेरिकेने न्यूक्लियर फ्यूजन म्हणजेच कृत्रिम सूर्य बनवला आहे. हा कृत्रिम सूर्य मूळ सूर्यापेक्षा अधिक उर्जा निर्मिती करणार असल्याचा दावा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने मंगळवारी (दि.13) अधिकृतपणे यासंदर्भात घोषणा केली. याआधी चीनने असा कृत्रिम सूर्य बनवला होता.
मिशिगन विद्यापीठातील न्यूक्लियर इंजिनीअरिंगच्या सहाय्यक प्राध्यापक कॅरोलिन कुरंज म्हणाल्या, सूर्याचं अस्तित्व धोक्यात आल्यामुळे कॅलिफोर्नियातील लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीच्या नॅशनल इग्निशन फॅसिलिटीमध्ये अमेरिकन शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्याची निर्मिती केली आहे. सूर्यापासून मिळते तशीच उर्जा या कृत्रिम सुर्यापासून मिळणार आहे. या ऊर्जेचा वापर भविष्यात ऊर्जा संकट दूर करण्यासाठी केला जाईल. पण यासाठी आणखी वेळ लागणार आहे. भविष्यातील स्वच्छ, अखंड ऊर्जास्त्रोत निर्मितीचं हे पहिलं पाऊल ठरणार आहे.
अधिक वाचा : ISRO कडून पाच वर्षात 177 परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण
भविष्यात कृत्रिम सूर्यामुळे लोकांना स्वच्छ, प्रदूषणमुक्त ऊर्जा पुरवठा मिळू शकेल. हा पुरवठा स्वस्त आणि अधिक काळासाठी उपलब्ध असेल. डय़ुटेरिअम आणि ट्रीटियम आयसोटोप्समध्ये संयोग प्रक्रिया केली जाईल. अणुकेंद्रक संयोग प्रक्रियेत घातक पदार्थ तयार होत नाहीत. तयार झालेल्या उर्जेपासून वाफ तयार करुन वीजनिर्मिती केली जाणार आहे. कृत्रिम सूर्यापासून तयार करण्यात येणारी वीज अणुऊर्जेपेक्षा स्वच्छ आणि सुरक्षित असेल. भारत, अमेरिका, युरोपसह 35 देश या प्रयोगामध्ये सहभागी होणार आहेत.