वृत्तसंस्था/ डोडा
डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्याच्या निर्णयाला समर्थन दर्शविणाऱ्या लोकांना तेथील वास्तव आणि इतिहासाबद्दल माहिती नसल्याचा दावा आझाद यांनी केला आहे. तसेच त्यांनी मागील 6 महिन्यांपासून दहशतवादी हल्ले वाढले असल्याचे नमूद पेले आहे.
कलम 370 जम्मू-काश्मीरसाठी उपयुक्त होते. कलम 370 घटनाबाह्या अन् बळाच्या जोरावर हटविण्यात आले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल असा पूर्ण विश्वास असल्याचे आझाद म्हणाले. कलम 370 हद्दपार करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या 23 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कलम 370 हे कुठलाही विशेष धर्म किंवा भागासाठी नव्हे तर सर्व लोकांसाठी उपयुक्त होते असे आझाद यांनी म्हटले आहे.









