वृत्तसंस्था/ कराची
54 वर्षीय मिकी आर्थर यांची पाक पुरुष क्रिकेट संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार असून या वृत्ताला पीसीबीकडून अधिकृत दुजोरा मिळाला आहे. चालू वर्षाच्या अखेरीस भारतात होणारा आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाक संघाची पूर्वतयारी करवून घेण्याची तयारी आता आर्थर यांच्यावर पीसीबीनी टाकली आहे.
2016 ते 2019 या कालावधीत मिकी आर्थर हे पाक क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. 2023 च्या भारतात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाक संघाच्या प्रशिक्षक वर्गामध्ये मिकी आर्थर यांचा समावेश राहिल. आगामी होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेवेळी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी पाक संघाबरोबर आर्थर यांची उपस्थिती राहिल. आर्थर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी पाकिस्तानने कसोटी आणखी टी-20 या क्रिकेटच्या प्रकारामध्ये पाकला अव्वल स्थान मिळवून दिले होते. तसेच 2017 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाक संघाला आर्थर यांचे मार्गदर्शन लाभले होते.









