वृत्तसंस्था / अमिरात
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अर्सनेलने रियल माद्रीदचा 3-0 अशा गोल फरकाने पराभव केला. या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात इंटर मिलानने बायर्न म्युनिचवर 2-1 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला.
अर्सनेल आणि रियल माद्रीद यांच्यातील सामना पूर्वाधार्थ चुरशीचा झाला. या सामन्यात डिक्लेन राईसने फ्रि किकवर दोन गोल तर मिकेल मेरीनोने एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात इंटर मिलानतर्फे निर्णायक आणि दुसरा गोल 88 व्या मिनिटाला डेव्हीड फ्रेटेसीने केला.









