वृत्तसंस्था/ मँचेस्टर
इंग्लिश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात अर्सनेल क्लबने आघाडीचे स्थान मिळविले आहे. तर लिव्हरपूल संघाने मँचेस्टर सिटीची विजयी घोडदौड रोखली. अन्य एका सामन्यात न्यू कॅसलने चेल्सीचा 4-1 असा पराभव केला.
लिव्हरपूल आणि मँचेस्टर सिटी यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. लिव्हरपूलतर्फे ट्रेंट अलेक्झांडर अर्नेल्डने नोंदवला. अर्सेनलने ब्रेंटफोर्डवर 1-0 अशी मात केली. अर्सेनलतर्फे हॅवर्झने एकमेव गोल केला. लिव्हरपूलने आणि मँचेस्टर सिटीची विजयी घोडदौर रोखली.









