घरगुती श्रीमूर्तींचेही वाजतगाजत स्वागत
वार्ताहर /धामणे
ग्रामीण भागातील सर्वच गावांमध्ये मंगळवारी गणरायाचे जल्लोषी आगमण झाले. धामणे, नंदिहळ्ळी, देसूर, राजहंसगड, नागेनहट्टी, सुळगा (ये.) या गावात सकाळपासूनच घरगुती गणपती मूर्ती वाजतगाजत व फटाक्यांची आतषबाजी करत आणण्यात आले. घरोघरी परंपरेनुसार गणपतीचे विधिवत पूजन करण्यात आले. महिला भक्तांकडून आपापल्या घरी गणपती आणण्यासाठी सहभाग दिसून आला. मंगळवारी सायंकाळी सार्वजनिक गणपतीमूर्ती आणण्यासाठी प्रत्येक गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते आपापल्या मंडळाच्या गणेशमूर्ती आणण्यासाठी तयारी करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणुकीने आगमन सुरूच होते.









