गायीने दिला गोंडस वासराला जन्म
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील लोककल्याण मार्गावर असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी एका गायीने वासराला जन्म दिला आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी 14 सप्टेंबर रोजी यासंबंधी सोशल मीडियावरून माहिती दिली. त्यांनी स्वत: वासराला अंगावर घेतल्याचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. तसेच नामकरण ‘दीपज्योती’ असे केल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्राण्यांवरील विशेषत: गायींवरील प्रेम लपलेले नाही. पंतप्रधानांच्या निवासस्थानी अतिशय खास जातीच्या (पुंगनूर) गायी पाळण्यात आल्या आहेत. यापैकी एका गायीने वासराला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी गायीच्या वासराला सांभाळताना दिसत आहेत.









