भक्तांनी केले स्वागत : माऊती मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला भेट
बेळगाव : बडेकोळ्ळमठाचे नागेंद्र स्वामी यांचे अनगोळ येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अनगोळ येथील रघुनाथ पेठ, मारुती मंदिर व नाथ पै नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला त्यांनी भेट दिली. त्यावेळी अनगोळ येथील भक्तांनी त्यांचे स्वागत केले. श्र् ााr क्षेत्र बडेकोळ्ळमठ येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वामींनी यावेळी दिली. शुक्रवार दि. 17 रोजी ध्वजारोहण, शनिवार दि. 18 रोजी पालखी महोत्सव, रविवार दि. 19 रोजी रथोत्सव, सोमवार दि. 20 रोजी खळ्याच्या कुस्त्या व दि. 21 रोजी ध्वजविसर्जन व पालखी निरोप समारंभ आणि त्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे. महाशिवरात्रीला भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मारुती मंदिर येथे स्वामीजींच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर स्वामीजींची पाद्यपूजा गल्लीतील ज्येष्ठ नागरिक शंकर कलघाण यांच्या हस्ते करण्यात आली. स्वामीजींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. बडेकोळ्ळ मठाचे महास्वामी येणार असल्यामुळे अनगोळ परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, विनायक गुंजटकर, दिगंबर राऊळ, विनायक पाटील, नागेश चिकमठ, सुरेश भांदुर्गे, दिनेश जाधव, शंकर बिर्जे, पुरुषोत्तम चौगुले, बाबुराव जाधव, चिदंबर जोशी, परशराम जाधव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









