रत्नागिरी/प्रतिनिधी
तालुक्यातील आगरनरळ येथील 17 वर्षीय मुलीसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या तरूणाला जयगड पोलिसांकडून अटक करण्यात आली.पीडित मुलीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. प्रणेश बाळकृष्ण गाडे (34, ऱा निवेंडी वरची रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. शनिवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणेश हा विवाहित असून त्याची पीडित मुलीशी मागील 2 वर्षापासून ओळख निर्माण झाली होती.यावेळी प्रणेश याने पीडितेशी ओळख वाढवून तिच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण केले.यातून प्रणेश याने पीडितेशी वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले.या प्रकरणी पीडितेकडून जयगड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 376 व बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संशयिताला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल़े गुह्याचा पुढील तपास जयगड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील करत आहेत.









