रायबंदर येथील सुनिल फडते खून प्रकरणी आरोपीला बंगळूरहून अटक
प्रतिनिधी /मडगाव
वीस वर्षापूर्वी भाडय़ाने टॅक्सी घेऊन नंतर टॅक्सी चालकाचा खून करुन टॅक्सी वाहन चोरुन नेणाऱया टोळीपैकी एका फरारी आरोपीला कुंकळी पोलिसांनी जेरबंद केले. खुनाची ही20 वर्षापूर्वी ही घटना घडली होती.
2020 साली अशा प्रकारचे दोन खून झाले होते. 18 जानेवारी 2002 रोजी रामभवनवाडा-रायबंदर येथील सुनिल फडके (28) याचा मृतदेह कुंकळी पोलीस स्थानकाच्या हृद्दीत येणाऱया बाळळी येथे सापडला होता.
याच कालावधीत बोर्डा -मडगाव येथील मुश्ताक खान (28) या टॅक्सी चालकांचा खून करण्यात आला होता. वेगवेगळय़ा तारखेला या दोन्ही टॅक्सी चालकांचे मृतदेह कुंकळी पोलीस स्थानकाच्या ह्द्दीत सापडले होते.
त्यावेळी पोलिसांना ते एक आव्हान होते. दोन खुनाचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांना पुढे होते आणि आरोपींनी तसा काही पुरावा मागे ठेवलेला नव्हता. त्यावेळी दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक इंद्रदेव शुक्ला होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांकडे बोलताना पोलिसांना या प्रकरणी काहीही धागा सध्यातरी सापडलेला नसल्याचे स्पष्ट केले होते.
सुमारे 20 वर्षानंतर या प्रकरणातील एक फरारी आरोपी बंगळूरला असल्याची माहिती कुंकळी पोलिसाना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण व इतर पोलीस सहकाऱयांनी बंगण्tरला जाऊन आरोपी रघु पाणीपुरी याला जेरबंद केले. त्याला बंगळुरात अटक करुन गोव्यात आणण्यात आलेले आहे.









