ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ सर्वधर्मीय, शिवप्रेमी व पुणेकरांतर्फे आज पुण्यात कडकडीत बंदसह मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह मविआतील अनेक नेते आणि शिवप्रेमी सहभागी झाले होते. दरम्यान, हा बंद बेकायदेशीर असल्याचा आरोप करत उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना अटक करा, अशी मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केली आहे.
सदावर्ते म्हणाले, बंद पुकारणे कायद्यानुसार बेकादेशीर आहे. बंदच्या नावाखाली मोर्चा काढणे आणि लोकांना वेठीस धरणे हे त्याहून चुकीचे आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले यांना हे शोभत नाही. भाजीवाले, रिक्षावाले यांचे हातावर पोट असते, त्यांना जबरदस्तीने बंदमध्ये सहभागी करुन घेत त्यांच्या पोटावर आपण पाय देऊ शकत नाही. त्यामुळे या मोर्चातील प्रमुख नेते म्हणून उदयनराजे भोसले यांना अटक करावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
अधिक वाचा : देवेंद्रजी, हे वाचाळवीर भाजपला बुडविल्याशिवाय राहणार नाहीत