समस्या असल्यास हेस्कॉमला संपर्क साधण्याचे आवाहन
बेळगाव : बेकिनकेरे शिवारात मागील कित्येक दिवसांपासून दुरवस्था झालेला ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मरमुळे विजेचा खेळखंडोबा सुरू होता. याबाबत हेस्कॉमला माहिती दिली असता. तातडीने त्याठिकाणी नवीन ट्रान्स्फॉर्मरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शेतवडीतील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. शिवारात विविध ठिकाणी झुकलेल्या वीजवाहिन्यादेखील हेस्कॉमने सुरळीत केल्या आहेत. काही ठिकाणी एका बाजूला कलंडलेले खांबदेखील पूर्ववत केले आहेत. एकूणच शेतकऱ्यांना कोणताही धोका पोहोचणार नाही. यासाठी वीजखांब, वीजवाहिन्या आणि ट्रान्स्फॉर्मरची व्यवस्था करण्यात आली. त्याबरोबर वीज वाहिन्यांबाबत समस्या असल्यास उचगाव येथील सेक्शन ऑफिसला संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.









