ग्रामस्थांची मागणी; निवडणूक अधिकाऱयांना †िनवेदन सादर
प्रतिनिधी /वाळपई
पैकुळ व गुळेली गावाला जोडणारा रगाडा नदीवरील पूल अद्याप पूर्ण झालेले नाही. तात्पुरती व्यवस्था म्हणून सदर नदीवर पदपूल उभारण्यात आला आहे?. मात्र यंदाच्या पावसामध्ये सदर पुलाचे संरक्षण कठडे वाहून गेले. यामुळे सदर पूल ये जा करण्यास धोकादायक बनला असून दि. 10 ऑगस्ट रोजी होणाऱया निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना सदर धोकादायक पुलावरून गुळेलीला जावे लागणार आहे. पूलावरून जाणे धोकादायक असून निवडणूक अधिकाऱयांनी पैकुळ गावात मतदान केंद्राची व्यवस्था करावी, अशी मागणी पैकुळ ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भाचे निवेदन निवडणूक अधिकाऱयांना सादर केले आहे.
गेल्या वषी जुलै महिन्यामध्ये सत्तरातील अनेक गावांना महापुराचा तडाखा बसला होता. यामध्ये पैकुळ नदीवर असलेला पूल कोसळला. यामुळे पैकुळ व गुळेली दरम्यानचा संपर्क तुटला होता. पैकुळ गावातील ग्रामस्थांची व्यवस्था व्हावी यासाठी सदर नदीवर जलसिंचन खात्यातर्फे पदपूल उभारण्यात आला होता. मात्र सदर पूल यंदाच्या पावसात पाण्याखाली जाऊन त्याचे संरक्षण कठडे वाहून गेले. यामुळे सदर पदपूल चालण्यासाठी धोकादायक बनला आहे. सदर पुलावर संरक्षण कठडे उभारण्यात यावेत अशी मागणी गेल्या पंधरा दिवसापासून होत आहे. मात्र त्याकडे जलसिंचन खात्याने अजूनपर्यंत दुर्लक्ष केल्यामुळे दि. 10 ऑगस्ट रोजी होणाऱया पंचायत निवडणुकीत नागरिकांना गुळेली गावाला मतदानासाठी जाण्यास सदर नदी पार करावी लागणार आहे. मात्र पुलावर संरक्षण कठडे नसल्याने पुल ओलांडणे धोक्मयाचे आहे. या गावातील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बोंडलामार्गे रस्त्याचा अवलंब करावा लागणार आहे. सदर रस्ता लांब पल्याचा असल्यामुळे गावातील मतदार मतदानावर बहिष्कार घालण्याची शक्मयता आहे. यामुळे सरकारने सदर पदपुलावर संरक्षण कठडे उभारण्याचे काम त्वरित हाती घेण्यात यावे अशी मागणी पैकुळ ग्रामस्थांनी केली होती. मात्र सदर मागणी अजून मान्य झालेली नाही.
यामुळे 10 ऑगस्ट रोजी होणाऱया मतदानामध्ये पैकूळ गावातील मतदार मतदान करण्याची शक्मयता कमी आहे. या संदर्भाची विनंती यापूर्वी संबंधित अधिकाऱयांना करण्यात आली होती. मात्र त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. पुढील चार दिवसांमध्ये सदर मागणी पूर्ण न झाल्यास मतदान करणार नाही, असा इशरा ग्रामस्थांनी दिला आहे.









