वेंगुर्ला शिवसेनेतर्फे नवरात्री निमित्त स्पर्धेचे आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या माध्यमातून वेंगुर्ला महिला शहर शिवसेनेतर्फे नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून वेंगुर्ले शहरातील सप्तसागर कॉम्लेक्स येथील शिवसेना कार्यालयात आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत अर्पणा आत्माराम सावंत (नाचणीची पातोळी) यांनी तर संगीत खुर्ची स्पर्धेत कृतिका सुरेंद्र कुर्ले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.या स्पर्धाचा शुभारंभ शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने—श्रीफळ वाढवून झाला. या प्रसंगी व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांत शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, उपजिल्हा प्रमुख सुनिल मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, कार्मिस आल्मेडा, सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, सुरेश कोरगांवकर, वेंगुर्ले शहर महिला संघटक सौ. श्रध्दा बावीस्कर–परब, मनाली परब, शबाना शेख, रसिका राऊळ आदींचा समावेश होता.
यावेळी सचिन वालावलकर यांनी, नवरात्रौत्सवात स्त्री शक्तीचा जागर हा हसत खेळत व्हावा या उद्देशाने व त्यांच्या अंगीभुत कलागुणांना प्रोत्साहन व त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या भागाचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला आहे. त्यांनी महिलांच्या विकासासाठी या जिल्ह्यात विविध योजनेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामाबाबतची माहिती दिली. या स्पर्धा उपक्रमांस महिलांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल महिलांचे आभारही व्यक्त केले.
वेंगुर्ला महिला शहर शिवसेनेतर्फे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून वेंगुर्ले मारूती स्टॉप नजीकच्या सप्तसागर कॉम्लेक्स येथील शिवसेना कार्यालयात येथे आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत २५ महिला स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. समिक्षा सचिन वालावलकर, सौ. अनुजा धारगळकर व सौ. उर्मिला उमेश येरम यांनी पाहिले.
या स्पर्धेत व्दीतीय–जयश्री जगन्नाथ चोपडेकर (नाचणीचे गुलाबजाब), तृतीय-प -ची प्रभाकर परब (नाचणीचा केक), उत्तेजनार्थ-तनुजा विवेक पाटणकर (नाचणीचे मोदक), कुंदन दिलीप परब (नाचणीचा केक) यांनी क्रमांक पटकाविले. तर संगीत खुर्ची स्पर्धेत व्दीतीय क्रमांक-वृषिका अतुल नेरूरकर, तृतीय- श्रीया शैलेंद्र गावडे यांनी क्रमांक पटकाविले.
या दोन्ही स्पर्धेत क्रमांक पटकाविलेल्या महिलांना वेंगुर्ला महिला शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख रकमेची पारीतोषिके देवून व सहभागी झालेल्या सर्व महिलांचा भेट वस्तु व गुलाबपुष्प देवून गौरव करण्यात आला. यावेळी इतर मनोरंजनाचे कार्यक्रमांत दांडीया नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम, सुत्रसंचालन अँङ श्रध्दा बावीस्कर-परब यांनी तर आभाराचे काम तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी पाहिले. सदर स्पर्धा पहाण्यासाठी शिवसैनिकांबरोबरच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.









