न्हावेली / वार्ताहर
राज्यातील ग्रामपंचायतींचा विकास कामात सहभाग करून घेण्याकरिता आर आर (आबा) पाटील तालुका सुंदर गाव योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. मार्गदर्शक सूचनांचे पालन करत सावंतवाडी तालुक्यातून आरोंदा व वेत्ये ग्रामपंचायतना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला. 91-91 असे गुण मिळवत दोन्ही ग्रामपंचायतींनी आपले नावलौकिक केले. सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून पात्र ठरलेल्या आरोंदा व वेत्ये ग्रामपंचायतची आर आर (आबा) पाटील तालुका सुंदर गाव म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पंचायतीस दिली. याव्यतिरिक्त सात तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.दरम्यान, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शासकीय कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळे सावंतवाडी तालुक्यातून सुंदर गाव योजनेत आरोंदा गावाचा प्रथम क्रमांक आल्याचे सरपंच आबा केरकर यांनी सांगितले.
Previous Article‘भारत माता की जय’ घोषणांनी परिसर दणाणला
Next Article महाविकास आघाडीसमोर महायुतीचे कडवे आव्हान









