वृत्तसंस्था / अहमदाबाद
येथे नुकत्याच झालेल्या 78 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय पुरुषांच्या जलतरण स्पर्धेमध्ये वॉटरपोलो या क्रीडा प्रकाराचे जेतेपद सेनादलाने पटकाविले. वॉटरपोलोच्या अंतिम सामन्यात सेनादलाने रेल्वेवर थरारक विजय नोंदवित अजिंक्यपद घेतले.
सेनादल आणि रेल्वे यांच्यातील हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. सेनादलाने रेल्वेवर 11-10 अशा केवळ एका गुणाने थरारक विजय मिळविला. या लढतीमध्ये दोन्ही संघ 10-10 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी शूटआऊटचा अवलंब केला. यामध्ये सेनादलाला विजेते तर रेल्वेला उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले.









