एक जवान हुतात्मा, अन्य 8 जण जखमी
► वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममधील डीएच पुरा भागात शनिवारी सकाळी लष्कराचे वाहन उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात एका जवानाला हौतात्म्य प्राप्त झाले आहे. तसेच अन्य 8 जवान जखमी झाल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातानंतर एकूण 9 जवान जखमी झाले होते. सर्वांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु ऊग्णालयात एका जवानाचा मृत्यू झाला. उर्वरित 8 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. जखमी जवानांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. घाटमार्गातील एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.









