सावंतवाडी प्रतिनिधी
उद्योजक, भाजपचे युवा कार्यकर्ते विशाल परब यांचा 36 वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उद्या 15 ऑक्टोंबरला सावंतवाडी जिमखाना मैदानावर सायंकाळी पाच वाजता भाजपच्या अनेक मंत्री महोदय व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. याच अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर प्रसिद्ध सिंगर जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट शो होणार आहे. या शोसाठी भव्य दिव्य असा मुख्य जिमखाना 24000 स्क्वेअर फुटचे स्टेज उभारण्यात आले आहे .तसेच 50,000 हून अधिक रसिक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सिंगर जुबिन नौटियाल येत आहे. त्यामुळे गोवा सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,कोल्हापूर बेळगाव आधी भागातून रसिक प्रेक्षक या सोहळ्यासाठी येणार आहेत. त्यामुळे या शोसाठी मोठी गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन तसे नियोजन करण्यात आले आहे. अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तीन केंद्रीय मंत्री व दोन राज्याचे कॅबिनेट मंत्री असे पाच मंत्री तसेच खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत.केंद्रीय अर्थमंत्री भगवान कराड, केंद्रीय मंत्री नारायण राणे ,केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ,राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर ,खासदार सदानंद तानावडे, आमदार चंद्रकांत शेटये ,माजी खासदार निलेश राणे ,आमदार नितेश राणे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर ,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, आदी उपस्थित राहणार आहेत.









