लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते सन्मान, सैन्यदलातील खेळाडूंकडूनही विक्रमी पदकप्राप्ती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
चीनच्या हांगझाऊ येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई खेळांत देशासाठी पदके ज्ंिांकलेल्या जवानांचा भारतीय लष्कराने एका खास समारंभात सन्मान केला. नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी 19 व्या आशियाई खेळांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जवानांचा गौरव केला. सैन्यातील खेळाडूंच्या कामगिरीवर खूप अभिमान व्यक्त करताना जनरल पांडे म्हणाले की, भारतीय खेळाडू रोइंग आणि सेलिंगसारख्या क्रीडास्पर्धांमध्येही उल्लेखनीय कामगिरी करताना पाहून आनंद झाला. ते देशासाठी खेळले आणि आम्हाला पदके मिळवून दिली. आमच्या खेळाडूंचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांची शिस्त, चिकाटी आणि समर्पण हे भारतीय सैन्याच्या मूलभूत मूल्यांचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले. या सत्कार कार्यक्रमात भालाफेकीतील जागतिक विजेता नीरज चोप्रा यालाही सन्मानित करण्यात आले. त्याने हांगझाऊ येथील आशियाई खेळांत दुसरे सुवर्णपदक जिंकले. तो लष्करात सुभेदारपदावर असून त्याने सदर बहुक्रीडा स्पर्धेत देशाचे आणि सैन्याचे प्रतिनिधीत्व केल्याचा अभिमान वाटतो, असे सांगितले. ‘हांगझाऊतील आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंतची आमची सर्वाधिक पदके जिंकून मायदेशी परतल्यानंतर एकमेकांना भेटताना खूप छान वाटले. अॅथलीट्सना पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहणाऱ्या लष्करप्रमुखांना भेटणे ही एक विशेष बाब होती. लढाईत असो किंवा खेळात असो, सैन्याचे प्रतिनिधीत्व करत असल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो.
सैन्यदलातील खेळाडूंनी जिंकली 20 पदके
भारतीय तुकडीने आशियाई खेळांत 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य अशा 107 पदकांसह ‘इस बार, 100 पार’ हे लक्ष्य पूर्ण केले. यापैकी सैन्यदलातील खेळाडूंनी 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 10 कांस्य अशी एकूण 20 पदके जिंकली. नीरजव्यतिरिक्त सैन्याच्या अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये आणि पुऊषांच्या कब•ाr स्पर्धेतील संघातून अर्जुन देशवालने देशासाठी सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या आशियाई खेळांमध्ये भारताने आपली आतापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकली. त्यात सैन्यदलानेही आपली कामगिरी सुधारली. 2019 च्या जकार्ता आशियाई खेळांमध्ये त्यांच्या खेळाडूंनी 13 पदके जिंकली होती.









