वृत्तसंस्था / हैद्राबाद
2024 च्या संतोष करंडक फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या अ गटातील अंतिम फेरीतील विविध सामन्यात विद्यमान विजेता सेनादल आणि माजी विजेत्या बांगलने प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले.
अ गटातील झालेल्या सामन्यात पश्चिम बंगालने तेलंगणाचा 3-0 असा गोल फरकाने पराभव केला. पश्चिम बंगालचा हा सलग दुसरा विजय असून ते आता या गटात गुणतक्त्यात आघाडीवर आहे. दोन्ही एका सामन्यात विद्यमान विजेत्या सेनादलने जम्मू-काश्मिरवर 4-0 अशी मात केली. जम्मू-काश्मिर संघाला या स्पर्धेत अद्याप आपले विजयाचे खाते उघडता आले नाही. तेलंगणाचा संघ गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहे.









