नवी दिल्ली :
दिल्ली पोलिसांच्या ठाणे सराई रोहिल्लाच्या पथकाने शस्त्रास्त्र आणि स्फोटकांच्या कच्च्या मालाच्या मोठ्या खेपेसह एका बेकायदेशीर शस्त्रास्त्र कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील विविध भागातून सतत छापे टाकून तीन आरोपींना अटक केली आहे. या छाप्यात पोलिसांनी 12 देशी बनावटीचे पिस्तूल, 250 हून अधिक पिस्तूल तसेच स्फोटके बनवण्यासाठीचा कच्चा आणि पक्का मालही जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची चौकशी सुरू आहे. मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.









