चंदिगड
पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवरून बीएसएफने मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. मंगळवारी सकाळी फिरोजपूरमध्ये 6 मॅगझिनच्या 3 एके-47 रायफल, 4 मॅगझिनच्या 3 एम-3 रायफल आणि 2 मॅगझिनच्या 2 पिस्तूल सापडल्या. प्राथमिक तपासाअंती ही शस्त्रास्त्रतस्करी पाकिस्तानातून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. याप्रकरणी कोणताही संशयित शस्त्रास्त्रतस्कर सापडलेला नाही. ड्रोनच्या माध्यमातून ही शस्त्रास्त्रे भारतीय हद्दीत पोहोचवल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. गेल्या आठवडय़ातही असाच प्रकार उघड झाला होता.









