वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या पाच जिह्यांमधून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एके सीरिज रायफल, पिस्तूलांचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी शनिवारी मणिपूरच्या पाच जिह्यांमध्ये अनेक कारवाईत किमान 90 बंदुकांसह दारुगोळा आणि स्फोटके जप्त केली. गुप्त माहितीच्या आधारे इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि विष्णुपूर जिह्यांमध्ये अनेक ठिकाणी एकाचवेळी समन्वित कारवाई सुरू करण्यात आली. मणिपूर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.









