लवकरच सुरू करणार चित्रिकरण
पाठीला ईजा झाल्यावर अभिनेता अर्जुन रामपाल हा बरा होण्याच्या मार्गावर आहे. यानंतर तो विद्युत जामवाल याचा चित्रपट ‘क्रॅक-जितेगा जो जिएगा’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला पुन्हा सुरुवात करणार आहे. अर्जुन अलिकडेच जिममध्ये वर्कआउट करताना जखमी झाला होता.

चित्रपटाचे चित्रिकरण थांबू नये म्हणून अर्जुनने पूर्ण प्रयत्न केले होते, परंतु प्रकृती बिघडल्याने चित्रिकरण थांबवावे लागले होते. चित्रपटाचे चित्रिकरण मध्येच रोखावे लागले होते. या चित्रपटाचे स्टंट तो स्वत:च करत होता. स्वत:च्या बॉडी डबलने स्टंट सीन्स करू नये अशी त्याची इच्छा होती. याचमुळे तो पूर्णपणे बरा झाल्यावर हे चित्रिकरण सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्तकडून करण्यात येत आहे. चित्रपटात विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अभिनेत्यासोबत या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि अर्जुन रामपाल देखील मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अर्जुन हा खलनायकाची भूमिका साकारत असल्याचे समजते.









