वृत्तसंस्था/ पणजी
भारताचे आघाडीचे ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी, आर. प्रज्ञानंद आणि पी. हरिकृष्ण हे पहिल्या विश्रांतीच्या दिवसानंतर येथे सुरू होणाऱ्या फिडे विश्वचषकाच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात त्यांची प्रभावी कामगिरी पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतील. देशाचा सर्वोच्च मानांकित खेळाडू अर्जुनचे अनुभवी हंगेरियन पीटर लेकोविऊद्ध पारडे जड असेल, तर प्रज्ञानंदचा सामना फिडेच्या झेंड्याखाली खेळणाऱ्या कल्पक डॅनिल दुबोव्हशी होईल. या तिघांपैकी सर्वांत अनुभवी हरिकृष्ण स्वीडनच्या निल्स ग्रँडेलियसचा मुकाबला करेल. स्पर्धेत टिकून राहण्याचे ध्येय हरिकृष्णही ठामपणे बाळगून आहे.
20 वर्षांपूर्वी एक जबरदस्त खेळाडू असलेला लेको त्याच्या पूर्वीच्या फॉर्मची लक्षणे दाखवत आहे. परंतु अर्जुनविऊद्ध गोष्टी सोप्या नसतील, ज्याला अत्यंत गुंतागुंत निर्माण करायला आवडते. 46 वर्षीय लेकोने ऑस्ट्रेलियाच्या बॉबी चेंग आणि ऑस्ट्रियाच्या किरिल अलेक्सेन्को यांना कोणत्याही टायब्रेक सामन्याशिवाय पराभूत केले, जे त्याच्या खेळाच्या गुणवत्तेबद्दल बरेच काही सांगते. योगायोगाने लेको हा निमनिवृत्त खेळाडू आहे आणि त्याचा शिष्य जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर देखील चौथ्या फेरीत आहे गुऊ आणि शिष्य या दोघांनीही बाद पद्धतीच्या स्पर्धेत बरीच मजल मारणे ही दुर्मिळ घटना आहे.
अर्जुनने त्याचे दोन्ही सामने कोणत्याही टायब्रेकरशिवाय जिंकले. भारतीय खेळाडूने आतापर्यंत क्लासिकल वेळेच्या नियंत्रणाखाली त्याचे चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि या प्रक्रियेत त्याने बल्गेरियाच्या मार्टिन पेट्रोव्ह आणि उझबेकिस्तानच्या शमसिद्दीन वोखिदोव्हला स्पर्धेबाहेरचा मार्ग दाखवला. दरम्यान, प्रेक्षकांच्या आवडत्या आर. प्रज्ञानंदची गाठ दुबोव्हशी पडणार आहे. हा रशियन खेळाडू जलद वेळेच्या नियंत्रणाखाली खेळताना देखील एक धोकादायक प्रतिस्पर्धी आहे. त्याने चीनच्या बाई जिनशी आणि उऊग्वेच्या जॉर्ज मेयरविऊद्ध दोन मॅरेथॉन टायब्रेक पार केले. वेग आणि अचूकतेच्या जोरावर त्याने ही उत्कृष्ट कामगिरी केली. प्रज्ञानंद त्याच्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यातच बाहेर पडण्याच्या जवळ होता. पण उझबेक-ऑस्ट्रेलियन खेळाडू तेमूर कुयबोकारोव्हविऊद्ध टायब्रेकरमध्ये तो कसा तरी बचावला. त्यानंतर तिसऱ्या फेरीतील प्रतिस्पर्धी आर्मेनियाच्या रॉबर्ट होव्हानिस्यानवर त्याने विजय मिळविला.
दुसरीकडे, हरिकृष्णने रशियाच्या आर्सेनी नेस्टेरोव्ह आणि बेल्जियमच्या डॅनियल दर्धा यांच्यावर व्यापक विजय मिळवत 32 खेळाडूंच्या फेरीत सहज प्रवेश केला आहे. पांढरे मोहरे घेऊन खेळताना विजय आणि काळे मोहरे घेऊन खेळताना बरोबरी हा हरिकृष्णचा मंत्र आहे. तो चौथ्या फेरीत ग्रँडेलियसला हरविण्यासाठी त्याच्या प्रचंड अनुभवावर अवलंबून असेल. जागतिक कनिष्ठ विजेता व्ही. प्रणव आणि 109 व्या मानांकित वेंकटरमन कार्तिक यांनीही प्रभावित केले आहे. ते प्रत्येकी तीन सामने खेळल्यानंतर चौथ्या फेरीत पोहोचले आहेत. अर्जुन, प्रज्ञानंद आणि हरिकृष्ण यांना त्यांच्या मोहिमेची सुऊवात करताना थेट दुसऱ्या फेरीत स्थान देण्यात आले होते.
पहिल्या दोन फेऱ्यांत अल्जेरियन अडा एडिन बोलरेन्स आणि नॉर्वेजियन आर्यन तारीचा पराभव केल्यानंतर प्रणवने लिथुआनियाच्या टिटास स्ट्रेमाविसियसविऊद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आणि पहिला गेम जिंकला. परतीच्या सामन्यात फक्त बरोबरीची आवश्यकता असल्याने प्रणवला कोणतीही अडचण आली नाही. कार्तिकने आतापर्यंत अरविंद चिदंबरम आणि डीक बोगदान डॅनियल यांना हरवले आहे आणि हा भारतीय खेळाडू व्हिएतनामच्या ले क्वांग लिमविऊद्ध सर्वोत्तम खेळ करण्याची अपेक्षा करेल. इतर लक्षवेधी लढतींमध्ये कीमरची लढत इराणच्या परहम मॅगसुदलूशी होईल, तर आर्मेनियन-अमेरिकन लेव्हॉन अॅरोनियनला पोलंडच्या राडोस्लाव्ह वोज्टास्झेककडून जोरदार आव्हान मिळेल.









