जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत चार विजय आणि एका पराभवासह आपल्या मोहिमेची सुऊवात करताना संयुक्तपणे पाचवे स्थान मिळविले आहे, तर गतविजेता मॅग्नस कार्लसनला निराशाजनक दिवस सहन करावा लागून त्याला येथे फक्त एक विजय मिळवता आला.
नॉर्वेच्या कार्लसनला तीन बरोबरीत सुटलेल्या सामन्यांमध्ये सूर सापडू शकला नाही आणि रशियन डेनिस लाझाविकविऊद्ध उशिरा पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत प्रभावित केलेला आणखी एक भारतीय म्हणजे 13 वर्षीय रौनक साधवानी. त्याने फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजाला नमवून आपल्या प्रतिभेची झलक दाखविली. 5 लाख 50 हजार डॉलर्सची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून अजून आठ बाकी आहेत.
रशियाचा मुर्झिन व्होलोदार, आर्मेनियाचा शांत सरगस्यान आणि डॅनियल नरोडितस्की व लेनियर दोमिंग्वेझ पेरेझ ही अमेरिकन जोडी प्रत्येकी 4.5 गुणांसह आघडीवर आहे. अर्जुन आणि साधवानी हे 11 खेळाडूंच्या पुढील गटात असून ते प्रत्येकी चार गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. या गटात अमेरिकेचा हिकारू नाकामुरा, उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह आणि हॉलंडचा अनीश गिरी यांचा समावेश आहे.
महिला विभागात स्थानिक स्टार अॅलिस लीने पहिल्याच दिवशी चारही सामन्यांत सलग विजय नोंदविले. या अमेरिकी खेळाडूसमोर विश्वविजेती चीनची वेनजुन जू, तिच्याच देशाची सहकारी झोंगी टॅन, अझरबैजानची गुने मम्मदजादा, जॉर्जियाची निनो बत्सियाश्विली आणि भारताची डी. हरिका यांचे आव्हान आहे. या सर्वांचे 3.5 गुण झाले आहेत. महिलांच्या स्पर्धेत सात फेऱ्या बाकी असताना तीन गुणांवर असल्याने भारतीय दृष्टिकोनातून आर. वैशालीवरही लक्ष ठेवावे लागेल. सर्वोच्च मानांकित आणि माजी विजेती कोनेरू हम्पी मात्र केवळ 2.5 गुण मिळवू शकली असून उर्वरित स्पर्धेमध्ये तिला बरीच मोठी झेप घ्यावी लागेल.
जर अर्जुनने ही स्पर्धा जिंकली, तर तो कँडिडेट्स स्पर्धेत जाणारा पहिला खेळाडू ठरेल. कँडिडेट्स स्पर्धेचे चक्र या वर्षाच्या सुऊवातीला सुरू झाले आहे आणि ते डिसेंबर, 2025 पर्यंत सुरू राहील. सध्या हा भारतीय खेळाडू अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाच्या मागे आहे. तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या सॅम्युअल सेव्हियनविऊद्ध झालेला एकमेव पराभव वगळता त्याने बऱ्याच गोष्टी योग्य पद्धतीने केल्या.









