घर अन् धान्य दुकानांमध्ये शिरायचा : उच्च न्यायालयात पोहोचले होते प्रकरण
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये धान्याच्या दुकानांवर जात गोंधळ उडवून देणारा रानटी हत्ती अरिकोम्बनला सोमवारी कुंबुम ईस्ट रेंजमध्ये 2 र्डाट्सद्वारे ट्रँकुलाइज करण्यात आले आहे. 40 वर्षीय या रानटी हत्तीच्या हालचालींवर तसेच आरोग्यावर 4 वेटरनरी डॉक्टरांचे पथक मागील काही दिवसंपासून नजर ठेवून होते.
तर मद्रास उच्च न्यायालयाने देखील केरळमधील सामाजिक कार्यकर्त्याच्या याचिकेवर सुनावणी करत त्याला कलाकड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्पात हलविण्याचा आदेश दिला आहे. परंतु अरिकोम्बनला तेथे सोडण्याच्या निर्णयाला आता विरोध सुरू झाला आहे.
29 एप्रिल रोजी चिन्नकनालनजीक अरिकोम्बनला पकडण्यात आले होते आणि पेरियार वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात आले होते, यानंतर 27 मे रोजी तामिळनाडूच्या कुंबुम येथे हा हत्ती पोहोचला होता. त्याने तेथेही दहशत निर्माण केली होती. थेनीमध्ये या हत्तीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
ट्रँकुलाइज करताना अरिकोम्बनला बेशुद्धावस्थेत नुकसान पोहोचवू नये याची काळजी तामिळनाडू आणि केरळ सरकारने घ्यावी अशी मागणी एका याचिकेद्वारे केरळ उच्च न्यायालयात करण्यात आली होती. हत्तीला अन्य कुठल्याही घनदाट जंगलात सोडण्यात यावे. तसेच तामिळनाडूत पकडण्यात आल्यावर त्याला केरळच्या सुपूर्द करण्यात यावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.









