प्रतिनिधी,कोल्हापूर
पंचगंगेचा महापुर म्हणजे कोल्हापूर शहराचा दक्षिण भाग वगळता बहुतेक भागात पाणी हे आता ठरलेलेच आहे. नदीकाठच्या भागाबरोबरच अन्य नागरी वस्तीतही पुराचे पाणी पसरल्याने कोल्हापूर जलमय होत आहे. यावर उपाययोजनाही सुरू आहेत. पण महापुराचे पाणी एखाद्या विशिष्ट भागात पसरणे रोखणे किंवा त्याची पातळी कमी करणे यासाठी एका शाळकरी विद्यार्थ्याकडून एक प्रोजेक्ट तयार केला गेला आहे. आणि या प्रोजेक्टबद्दल तो डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक टॅलेंट सर्च स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.
अर्ह अभिजीत गणपती या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांने या प्रोजेक्टची मांडणी केली. आहे. हा प्रोजेक्ट किती टक्के आर्थिकदृष्ट्या फिजिकल, त्याची व्याप्ती, त्याची अंमलबजावणी हा नक्कीच पुढचा भाग आहे. शासकीय यंत्रणा हा प्रोजेक्ट राबवेल का हाही त्यापुढचा भाग आहे.पण एक शाळकरी विद्यार्थी 2021 च्या महापुराची भीषणता पाहून अस्वस्थ कसा होतो. व आपल्या परीने तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन एखादा प्रोजेक्ट तयार करतो व त्यातून सुवर्णपदक मिळवतो हे या प्रोजेक्टचे वेगळेपण ठरले आहे.
ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशनच्या वतीने दरवर्षी एखादा विषय देऊन विद्यार्थ्यांच्यातील कल्पनांना चालना दिली जाते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 20 हजार विद्यार्थी बसले होते. लेखी व तोंडी परीक्षेतून अंतिम प्रोजेक्टसाठी ठराविक विद्यार्थ्यांची निवड होते. यावर्षी नैसर्गिक आपत्ती व त्यावरच्या उपाययोजना हा विषय होता.
या परीक्षेत अर्ह गणपुले अंतिम फेरीत पोहोचला. त्याने 2021 चा कोल्हापूरचा महापूर पाहिला होता. विशेषत: बापट कँप, मुक्त सैनिक वसाहत, शिरोली परिसरातील महापुराची भीषणता अनुभवली होती. त्यावर त्याने संपूर्ण महापूर रोखता येणार नाही हे गृहीत धरून महापुराचे नागरी वस्तीत घुसणारे पाणी रोखून नुकसान कमी करण्यासाठी विशिष्ट अंतरावर मोठ्या नळाद्वारे पाणी जमिनीत मुरवता येईल. म्हणजेच बापट कँपच्या टोकापर्यंत पसरणारे पाणी बापट कँपच्या विशिष्ट भागात मर्यादित रोखता येईल अशी प्रोजेक्टची आखणी केली. यासाठी त्याला आर्किटेक्ट असोसिएशनचे विजय चोपदार, मिलिंद तोरो सर यांचे मार्गदर्शन लाभले. हा प्रोजेक्ट आर्थिकदृष्ट्या किती फिजिबल यापेक्षा एक शाळकरी विद्यार्थी या अँगलने पूर रोखण्याचा विचार करू शकतो, म्हणून त्याला यंग सायंटिस्ट अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्याला तीन हजार रुपये स्कॉलरशिप मंजूर करण्यात आली हा डॉ. अभिजीत व डॉ. गौतमी यांचा मुलगा आहे. तो संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









