Crime News : इन्स्टाग्राम फॉलोअर्सवरुन वाद विकोपाला गेल्यामुळं आपल्या मित्राच्याच हत्येचा कट अल्पवयीन तरुणीनं भावाच्या मदतीनं रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर दिल्ली परिसरात तरुणाच्या गळ्यावर चाकूनं सपासप वार करुन त्याची हत्या करण्यात आली. साहिल असे मृत तरूणाचे नाव आहे. दसऱ्याच्या दिवशी रात्री हि घटना घडली. याबबात पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत साहिलची एका १७ वर्षीय संशियीत आरोपी तरुणीशी मैत्री होती. याच तरुणीनं साहिलच्या हत्येचा कट रचला. बुधवारी रात्री मुलीनं तिचे दोन मित्र आणि भावाच्या मदतीनं साहिलची हत्या केली. साहिलच्या मानेवर चाकूचे निशाण आढळून आले आहेत. त्यामुळे साहिलची हत्या गळ्यावर चाकून वार केल्यानं झाली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. साहिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, रुग्णालयात उपचारादरम्यान साहिलचा मृत्यू झाला.
हेही वाचा- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली काळाच्या पडद्याआड
असा केला हल्ला
साहिल तरुणीच्या घराजवळ पोहोचताच तिचे दोन मित्र आणि भाऊ तिथे पोहोचला. त्यानंतर तरुणीच्या एका मित्रानं चाकू काढून साहिलच्या गळ्यावर सपासप वार केले. यात साहित गंभीर जखमी झाला. सध्या पोलिसांनी अल्पवयीन तरुणीसह तिचा भाऊ आणि एका मित्राला ताब्यात घेतलं आहे. तर आणखी एक मित्र फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
Previous Articleपालिका वटहुकुमावर राज्यपालांची स्वाक्षरी
Next Article राज्यात ‘यलो अलर्ट’









