वृत्तसंस्था/ रिओ डी जानेरो
अतिशय चुरशीच्या झालेल्या 2026 विश्वचषक फुटबॉल पात्रता लढतीत अर्जेन्टिनाने ब्राझीलचा 1-0 गोलने पराभव केला.
येथील माराकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 63 व्या मिनिटाला अनुभवी डिफेंडर निकोलास ओटामेंडीने हेडरवर एकमेव गोल केला आणि हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. या विजयाचे अर्जेन्टिनाला 3 गुण मिळाले. दक्षिण अमेरिका पात्रता विभागात अर्जेन्टिना आता 6 सामन्यांतून 15 गुण घेत आघाडीचे स्थान मिळविले आहे. अलीकडेच त्यांना उरुग्वेकडून पराभव स्वीकारला होता. पात्रता फेरीत ब्राझीलचा हा तिसरा पराभव असून पाचवेळचे वर्ल्ड चॅम्पियन्स ब्राझील 6 सामन्यांत 7 गुण घेत सहाव्या स्थानावर आहे. सामना सुरू होण्याआधी अर्जेन्टिनाच्या चाहत्यांनी हुल्लडबाजी करून गोंधळ घातल्याने त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. खेळाडूंनी चाहत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा गोंधळ चालूच राहिल्यानंतर लायोनेल मेस्सीसह अर्जेन्टाईन खेळाडूंनी मैदान सोडले होते.









