उपाध्यक्षपदी दिलीप राऊळ
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी अर्चित पोकळे, उपाध्यक्षपदी दिलीप राऊळ, खजिनदार शैलेश मेस्त्री, उप खजिनदार बिट्टू सुकी तर सेक्रेटरीपदी तेजस टोपले यांची निवड करण्यात आली आहे. यंदा मंडळाचे ३३ वे वर्ष असून यानिमित्त रविवार १५ ऑक्टोबर पासून विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या नवरात्र उत्सवात धार्मिक कार्यक्रमांसह भजन, फुगडी, दांडीया, रेकॉर्ड डान्स आदी सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहेत. कुंकुमार्चनसह विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत. नवरात्र उत्सवातील या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी केले आहे.









