वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची लांब पल्ल्याची धावपटू अर्चना जाधव उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याबद्दल तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले असल्याचे अॅथलेटिक्स इंटेग्रिटी युनिटने (एआययू) जाहीर केले.
20 वर्षीय अर्चना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये शेवटचा भाग घेतली होती. भारतीय महिला गटात तिने चौथे स्थान मिळविले. लिली दास, कविता यादव, प्रीती लांबा यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले होते. एआयूनुसार, जाधवच्या नमुन्यात ऑक्झांड्रोलोन हे निर्बंधित द्रव्य आढळून आले. त्यामुळे तिच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एआययूने ही माहिती एक्स हँडलवर दिली. पण त्यांनी उत्तेजक चाचणीतील दोषाचा तपशील दिलेला नाही.









