बेळगाव – तेरदाळचे आमदार सिद्धू सावदी यांनी 2019-2020 मध्ये पुरामुळे नुकसान झालेल्या घरांना मदत देण्यात अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक मनमानी केल्याचा आरोप केला. विधानसभेच्या अधिवेशनात तेरदाळचे आमदार सिद्धू सवदी यांनी आरोप केला की, 2019-2020 या वर्षात पुरामुळे नुकसान झालेल्या घरांपैकी 21 घरे ब वर्गात सामील करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत 6 ते 8 लाख रुपये खर्चून नवीन घरे बांधण्यात आली आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे त्या घरांची दुरुस्ती ठरवून 6 लाखांचा निधी 3 लाखांवर आणला आहे. मात्र यामुळे कर्ज घेऊन घरे बांधणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पैशाच्या लोभापोटी जाणीवपूर्वक B श्रेणीतून त्या घरांना कमी करण्यात आले आहे. तेथील उपविभागीय अधिकाऱ्याकडे तपासणी करून आदेशही देण्यात आले आहेत असा आरोप केला यावर मंत्री गोविंद करजोळ म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांना व तहसीलदारांना चुका सुधारण्याचे आदेश दिले जातील. त्यावर उर्वरित सदस्यांनी तेरदाळसाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यातील ही समस्या सोडवण्याची मागणी केली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









